Ad will apear here
Next
पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव

पुणे : आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

पोलीस बांधवानी प्रज्वलित केलेल्या शेकडो पणत्यांनी आणि रांगोळ्यांनी सनसिटी पोलीस स्टेशनचा परिसर उजळून निघाला. पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके, उपनिरीक्षक कणसे व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह युवा वाद्य पथकाचे अनिष पाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, अभिजित बोरा, विकास कांबळे, सागर पानसरे आदी उपस्थित होते. 

‘आपल्या सुरक्षितेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता म्हणून दर वर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने असा दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा सनसिटी पोलीस स्टेशन, सिंहगड रोड येथे हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस बांधवांना कर्तव्यावर असूनही दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळतो, त्याचे समाधान आम्हाला लाभले,’ असे शशिकांत कांबळे यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZZLCG
Similar Posts
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
...आणि ‘त्यांच्या’ही डोळ्यांत उजळली दिवाळी! पुणे : सुंदरसा पाट, रांगोळ्यांचा थाट, सुगंधी तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचे ताट, नव्या कपड्यांचा साज आणि गोडाचा घास यामुळे ‘त्यांच्या’ डोळ्यांत दिवाळीच्या लाख लाख दीपांचे तेज झळकत होते. चेहरे आनंदाने फुलबाज्यांसारखे खुलले होते.. हे दृश्य होते नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या अनोख्या दिवाळीचे
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language